एकल महिलांचा सन्मान अंतर्गत हळदी कुंकू कार्यक्रम
नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय श्री.ओमकार पवार सर यांच्या संकल्पनेतून पतीच्या निधनानंतर पत्नीचे जोडवे काढणे,मंगळसूत्र काढणे व कुंकू पुसणे अशा अमानवी,कालबाह्य व स्त्रीच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचविणाऱ्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी आजरोजी ग्रामपालिका चांदोरीच्या वतीने एकल महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात आला.सदर कार्यक्रमास श्रीमती.नम्रता जगताप गटविकास अधिकारी पंचायत समिती निफाड,श्रीमती.आरती गांगुर्डे CDPO बालविकास विभाग निफाड,श्री.संदिप घुगे सायखेडा पोलीस स्टेशन,DR श्रीमती.सारिका डेर्ले तसेच ग्रामपालिका सरपंच श्री.विनायक खरात,उपसरपंच सौ.छाया संदिप जाधव व ग्रा.पं सर्व पदाधिकारी,श्री.सुरेश भांबारे ग्रामपंचायत अधिकारी,तसेच गावातील सर्व जेष्ट श्रेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला,सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने एकल महिलांची उपस्थित लाभली.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष गटविकास अधिकारी यांचेकडून एकल महिलांना खालीलप्रमाणे संदेश देण्यात आला....
???? विधवा महिलांचा सन्मान, आत्मसन्मान व मानवी हक्क अबाधित ठेवणे.
???? अंधश्रद्धा व कुप्रथांना ठाम नकार देणे
???? समानता, संवेदनशीलता व सामाजिक न्यायाची जाणीव निर्माण करणे.
हे केवळ प्रशासकीय नाही तर सामाजिक परिवर्तनाचे अभियान आहे.
प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक कुटुंबाने आणि प्रत्येक गावाने या जनजागृतीत सहभागी होणे ही काळाची गरज आहे.
चला, कुप्रथांविरुद्ध एकत्र उभे राहूया.
महिलांचा सन्मान जपूया – माणुसकी जपूया.